Friday 29 April, 2011

चिनी माती

शीव-पनवेल महामार्गावर सुबकरित्या मांडलेली चिनी मातीची भांडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग याची मोहिनी पडली नाही तरच नवल.




Wednesday 27 April, 2011

जिथे भिंतींना झाडे फ़ुटतात !

भिंतींना कान असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांना झाडे देखिल फ़ूटतात. दोघांचे परिणाम मात्र वेगवेगळे आहेत. त्यांना कान असल्यामुळे इतरांची फ़रफ़ट होते आणि झाडांमुळे त्यांची स्व:ताची.


Tuesday 26 April, 2011

चविष्ट कांदापोहे !

कांदापोहे चविष्ट बनविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण ते जमिनीवर सांडून, त्याच्यात खेळून दुसर्याला डीश आणि चमचा वाजवून दाखवून मग ते खाण्याची मजा काही औरच असते.

Monday 25 April, 2011

वणवण !


पाण्याच्या थेंबासाठी अशी वणवण अजूनही करावी लागते.


Sunday 24 April, 2011

wall paper

desktop वर टाकण्यासाठी एक मस्त wall paper अपलोड करत आहे. या पानाचा हिरवा रंग मस्तच वाटतो.गो ग्रीन!

Saturday 23 April, 2011

क्षणभर विश्रांति !

झाडाखाली झोप काढण्याची मजा काही औरच असते. पण ड्युटीवर असताना कार्यालयातील बागेत अशी झोप काढण्याची खुमारी काही वेगळीच! असे सूख सगळ्यांनाच मिळत नाही. पुरावा सादर आहे.

Friday 22 April, 2011

डोकेबाज !

सर्वसाधारणपणे उपजीविकेसाठी माणसाला स्वताचे डोके वापरावे लागते. परंतु काहिजणांना मात्र दुसर्याच्या डोक्याचा सुध्दा वापर करावा लागतो. स्व:ताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर संसार मांडलेल्या या कुटुंबाला जरी दुसर्याच्या डोक्याचा आधार घ्यावा लागत असला तरी विक्रिसाठी डोके चालवून मोक्याची जागा पकडली आहे !

Thursday 21 April, 2011

चंद्रप्रभा

चंद्राची छायाचीत्रे घेताना असे वाटत होते कि हा क्यामेरा पुरेसा नाही. का कोणास ठाउक आज हा प्रकाश जरा वेगळाच वाटला. पण त्याची जादू काहीतरी वेगळीच! पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखी आणि तरीही दरवेळेला वेगळेपण जपणारी!



Wednesday 20 April, 2011

इथे ओशाळले ट्राफ़िक !

हि पहा आधुनिक वाह्तूक नियंत्रण व्यवस्था! चिपाड झालेली पिंपे डिव्हायडर म्हणून वापरली जात आहेत आणि शरमेने सिग्नल आकाशाकडे पाहात आहेत. बसवलेले सिग्नल विमानांसाठी आहेत अशी सगळ्यांची समजूत असावी आणि कुणाला कशाचीच तमा नसल्याचा हा पुरावा. सगळेच ढेपाळलेले.



Tuesday 19 April, 2011

कलिंगडाची रास...रसाळ !!

उन्हाळा सुरु झाला कि कलिंगडाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ही पहा कलिंगडाची सुबक रित्या मांडलेली रास. आता त्याच्यावर उड्या पडणार नाही तर काय होणार. आणि त्याबरोबर खास आमंत्रण आणि आठवणसुद्धा!


Wednesday 13 April, 2011

सुंदर सकाळ

सकाळी फिरायला निघालो आणि अचानक फिकट डोंगरांच्या रांगा हसल्यासाख्या वाटल्या, हिरवाई मोहरली आणि बघतो तर लालशेंदरी छ्टा असलेला गोळा धरेला चुंबत वर येत होता! तो रविराज आता आपल्या कोवळ्या किरणांनी अलगद धरेला कुरवाळणार होता!!

Monday 11 April, 2011

ठिबक सिंचन

टाकावू बेसिनचा उपयोग कसा ठिबक सिंचनासाठी केला आहे बघा! अणि त्याच्या बाजूला शांत झोपलेले दोन कुत्रे ते दिसतात तसे नाहियेत. ते शांत झोपलेले आहेत असे फक्त वाट्ते, त्यानी हा फोटो मला सहजासहजी काढू दिलेला नाही. दोन तिन दिवसांच्या परिश्रमानंतर गूपचूप हा फोटो काढलेला आहे.

Thursday 7 April, 2011

अद्भूत छटा!!

निसर्गाच्या वसंत ऋतूतील अद्भूत छटा!!







!!



!













Tuesday 5 April, 2011

फ़ुलून मोहोरलेले!

वसंतोत्सव! कडक उन्हात सुद्धा फुलण्याची किमया वृक्षवल्लीना साधली आहे.

असहाय वृक्ष

असा हात पाय तोडलेला असहाय वृक्ष!! दुसर्याला देत रहाण्याचे त्याचे कार्य तरीही तो थांबवत नाही.