Monday, 30 May 2011

आशेचा किरण !


पुर्ण सुकलेले झाड आणि फक्त 4 पानांची हिरवाई! स्वप्नांना मर्यादा नसते तशीच आशेलाही! आशेचा एखादा किरण सुध्दा तग धरायला पुरेसा ठरतो. इथे तर चार पाने आहेत.....




Friday, 20 May 2011

कानगोष्टी !

कसले प्लानिंग चालले आहे? घर कुठे घ्यायचे...ह्या झाडावर कि त्या झाडावर! पत्रिका कधी वाटायच्या...पंगती वाढायच्या कि बुफे ठेवायचा? चिमणा आपल्या Valentine ला कसा खुश करतोय बघा.

Monday, 16 May 2011

दिव्याखाली अंधार !


एका झाडाखाली हिरवे गवत, श्रीकृष्णाची तसबीर पूजेसाठी ठेवलेली. चरणारे गोधन, जणू काही खरे गवतच खात आहे. पण झाड मात्र निष्पर्ण आणि पार्श्वभूमीवर दिवा, सगळेच चमत्कारीक.

Saturday, 14 May 2011

Tuesday, 10 May 2011

भोग !

न थांबवता येणारी गोष्ट. मग ती वस्तू असो की व्यक्ती. खूप स्वप्ने रंगवून आपल्या मनासारखी एखादी वस्तू घ्यावी, तीला जपावी, प्रेमाने वापरावी इतपर्यंत सगळे ठीक. मात्र तीच वस्तू जूनी झाली की त्रास द्यायला लागते अणि मग नडायला! गाडीचे अगदी असेच आहे. जोपर्यंत साथ देतेय तोपर्यंत हवीहवीशी वाटते...मात्र फार कुरकुरायला लागली की अवस्था अगदी बघवेनाशी होते.

Monday, 9 May 2011

कातरवेळ !

कातरवेळ फक्त संध्याकाळीच असते का? ती सकाळी नसते का? पण हा सुर्योदय थोडा वेगळा वाटतोय. दाट वृक्षराजीतून डोकावणारा हा भास्कर आणि त्याचे पडलेले ते पाण्यातील प्रतिबिंब संध्याकाळच्या त्या ओलसर पण वेगळीच विरक्त भावना चिथावणा-या वेळेशी साधर्म्य सांगणारा, थोडा दमट पण तरीही आशेचा किरण दाखवणारा.

Sunday, 8 May 2011

केविलवाणे घरटे !

झाडांची कत्तल झाली. जंगले उघडी बोडकी झाली. पक्षांचा आसरा गेला. आता सहारा सिमेंटच्या जंगलांचा आणि कॄत्रिम आडोशाचा. डिझेल जनरेटरच्या आडोशाला स्व:ताच्या स्वप्नांचा महल बांधताना ही जोडीला कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल कोणास ठाउक. जर हाउसकिपिंग चे लोग कार्यक्षम (किंवा असंवेदनशील) असतील तर हा महल घटका भराचाच ठरु शकेल.

Friday, 6 May 2011

हिरव्याहून पिवळे !



ही पण एक वसंतातली कमाल. झाडावर पानांपेक्षा फुलेच अधिक! ती ही पिवळी धम्मक, रसरशीत, मस्त बहरलेली ! अर्थात आता ही जादू नाहीशी होइल. ढग जमू लागले आहेत. थोडया दिवसांनी हिरवाईचा शालू पांघरला जाईल.

Thursday, 5 May 2011

आधुनिक पायवाट

या पायवाटेला वळणे असती तर किती बरे झाले असते...पण कोकणातल्या लाल मातीतल्या पायवाटेची सर याला नाही हे ही तितकेच खरे. लाल गडद लाल माती आणि बाजूला पसरलेली रानफुले आणि नदी पर्यत जाणारी पायवाट याची मजा आणि सौंदर्य या पायवाटेला नाही ही आपली कमनशीबी.

Wednesday, 4 May 2011

wall paper







Tuesday, 3 May 2011

ही वाट दूर जाते !


कधीही न संपणारी वाट. पण वाट अशी असेल तर संपूच नये असे वाटेल.

Monday, 2 May 2011

महाभारतातले ढग !

प्रत्येक ढगाला एक विशिष्ट आकार असतो किंवा आपण कशाशी तरी त्याचा संदर्भ लावतो. कुरुक्षेत्रावरील अनेक छायाचित्रात असेच एका विशिष्ट पद्धतीचे ढग दाखविले जातात.विशेषत: भगवान श्रीकृष्ण गीता सांगताना जे दॄष्य चित्रित केले जाते त्याच्याशी साधर्म्य साधणारे ढग अचानक दॄष्टिस पडले, पाउले थबकली आणि असे वाटले कि श्रीकॄष्णाचेसुद्धा दर्शन होइल.


Sunday, 1 May 2011

हा माझा मार्ग एकाला !

पाखाडी उतरुन हा माणूस चाललाय तरी कुठे? पुढे तर मिट्ट काळोख दिसतोय. हा मार्ग नुसताच एकलाच नाही तर खडतर सुद्धा आहे.