Showing posts with label कळा लागल्या जिवा. Show all posts
Showing posts with label कळा लागल्या जिवा. Show all posts

Thursday, 9 June 2011

धुमसते भाव !





या काश्मिरी मुलाकडे बघून तेथील लोकांचा थोडाफार अंदाज येतो....त्याला नक्की काय सांगायचे आहे....भाव थोडे रागीट, गोंधळलेले, निरागसता हरवलेली तरीही डोकावणारी.....भविष्याचा काहिही अंदाज नसलेले...वेगळेच...





Tuesday, 10 May 2011

भोग !

न थांबवता येणारी गोष्ट. मग ती वस्तू असो की व्यक्ती. खूप स्वप्ने रंगवून आपल्या मनासारखी एखादी वस्तू घ्यावी, तीला जपावी, प्रेमाने वापरावी इतपर्यंत सगळे ठीक. मात्र तीच वस्तू जूनी झाली की त्रास द्यायला लागते अणि मग नडायला! गाडीचे अगदी असेच आहे. जोपर्यंत साथ देतेय तोपर्यंत हवीहवीशी वाटते...मात्र फार कुरकुरायला लागली की अवस्था अगदी बघवेनाशी होते.

Sunday, 8 May 2011

केविलवाणे घरटे !

झाडांची कत्तल झाली. जंगले उघडी बोडकी झाली. पक्षांचा आसरा गेला. आता सहारा सिमेंटच्या जंगलांचा आणि कॄत्रिम आडोशाचा. डिझेल जनरेटरच्या आडोशाला स्व:ताच्या स्वप्नांचा महल बांधताना ही जोडीला कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल कोणास ठाउक. जर हाउसकिपिंग चे लोग कार्यक्षम (किंवा असंवेदनशील) असतील तर हा महल घटका भराचाच ठरु शकेल.

Thursday, 5 May 2011

आधुनिक पायवाट

या पायवाटेला वळणे असती तर किती बरे झाले असते...पण कोकणातल्या लाल मातीतल्या पायवाटेची सर याला नाही हे ही तितकेच खरे. लाल गडद लाल माती आणि बाजूला पसरलेली रानफुले आणि नदी पर्यत जाणारी पायवाट याची मजा आणि सौंदर्य या पायवाटेला नाही ही आपली कमनशीबी.

Monday, 25 April 2011

वणवण !


पाण्याच्या थेंबासाठी अशी वणवण अजूनही करावी लागते.


Wednesday, 20 April 2011

इथे ओशाळले ट्राफ़िक !

हि पहा आधुनिक वाह्तूक नियंत्रण व्यवस्था! चिपाड झालेली पिंपे डिव्हायडर म्हणून वापरली जात आहेत आणि शरमेने सिग्नल आकाशाकडे पाहात आहेत. बसवलेले सिग्नल विमानांसाठी आहेत अशी सगळ्यांची समजूत असावी आणि कुणाला कशाचीच तमा नसल्याचा हा पुरावा. सगळेच ढेपाळलेले.



Tuesday, 5 April 2011

असहाय वृक्ष

असा हात पाय तोडलेला असहाय वृक्ष!! दुसर्याला देत रहाण्याचे त्याचे कार्य तरीही तो थांबवत नाही.