Showing posts with label गंमतशीर. Show all posts
Showing posts with label गंमतशीर. Show all posts

Friday, 31 August 2012

Friday, 9 December 2011


लेडिज बाथरूम वरिल साईन बोर्ड

Monday, 21 November 2011

Don’t disturb !!!



धुलाई यंत्र बरोबर काम करते आहे कि नाही हि तपासणी चालू आहे. Don’t disturb !!!

Thursday, 3 November 2011

जाहिरात ...!

अशी वेळ खरच आली तर?

Wednesday, 26 October 2011

उभे कि आडवे !

हे चहापात्र उभे आहे कि आडवे...खरे कि खोटे?

Friday, 2 September 2011

हे डोळे कुणाचे ?




अर्थात निसर्गाचे ! या पाण्याच्या थेंबातील तुम्हाला निरखणारे डोळे पहा. निसर्ग तुम्हाला मिळेल त्या मार्गाने बोलावतोय.....तुम्ही आता तरी प्रतिसाद देणार ना?


Tuesday, 2 August 2011

मराठी बाणा !




मी कुणाला भित नाही. भिणार नाही. एकटा राहीलो तरी चालेल पण मान ताठच राहील असे तर हे रोपटे सांगत नाहि ना!!

Thursday, 30 June 2011

बागडणारी पाल!




पावसाच्या आगमनाने सगळेच प्राणी आनंदून जातात. ही छोटी पाल काचेवर मस्त बागडत आहे.

Wednesday, 22 June 2011

मेरावाला निळा!




आकाशाची अद्भूत निळाई . ही शेड कुठे मिळेल का?















Friday, 17 June 2011

आकाशात हिरोशिमा !





विमान प्रवासात टिपलेला हा ढग ! ढगाचा आकार अणूस्फ़ोटानंतर उडालेल्या धुराळ्याप्रमाणे दिसतोय !




Tuesday, 14 June 2011

नमूना हिंदी

काश्मिर मधिल एका उपहारगृहातील हिंदीमधून लिहिलेला हा फलक..!



Wednesday, 1 June 2011

हा खेळ सावल्यांचा!

एक गमतीदार फोटो....

Monday, 30 May 2011

आशेचा किरण !


पुर्ण सुकलेले झाड आणि फक्त 4 पानांची हिरवाई! स्वप्नांना मर्यादा नसते तशीच आशेलाही! आशेचा एखादा किरण सुध्दा तग धरायला पुरेसा ठरतो. इथे तर चार पाने आहेत.....




Friday, 20 May 2011

कानगोष्टी !

कसले प्लानिंग चालले आहे? घर कुठे घ्यायचे...ह्या झाडावर कि त्या झाडावर! पत्रिका कधी वाटायच्या...पंगती वाढायच्या कि बुफे ठेवायचा? चिमणा आपल्या Valentine ला कसा खुश करतोय बघा.

Monday, 16 May 2011

दिव्याखाली अंधार !


एका झाडाखाली हिरवे गवत, श्रीकृष्णाची तसबीर पूजेसाठी ठेवलेली. चरणारे गोधन, जणू काही खरे गवतच खात आहे. पण झाड मात्र निष्पर्ण आणि पार्श्वभूमीवर दिवा, सगळेच चमत्कारीक.

Friday, 6 May 2011

हिरव्याहून पिवळे !



ही पण एक वसंतातली कमाल. झाडावर पानांपेक्षा फुलेच अधिक! ती ही पिवळी धम्मक, रसरशीत, मस्त बहरलेली ! अर्थात आता ही जादू नाहीशी होइल. ढग जमू लागले आहेत. थोडया दिवसांनी हिरवाईचा शालू पांघरला जाईल.

Wednesday, 27 April 2011

जिथे भिंतींना झाडे फ़ुटतात !

भिंतींना कान असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांना झाडे देखिल फ़ूटतात. दोघांचे परिणाम मात्र वेगवेगळे आहेत. त्यांना कान असल्यामुळे इतरांची फ़रफ़ट होते आणि झाडांमुळे त्यांची स्व:ताची.


Tuesday, 26 April 2011

चविष्ट कांदापोहे !

कांदापोहे चविष्ट बनविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण ते जमिनीवर सांडून, त्याच्यात खेळून दुसर्याला डीश आणि चमचा वाजवून दाखवून मग ते खाण्याची मजा काही औरच असते.

Saturday, 23 April 2011

क्षणभर विश्रांति !

झाडाखाली झोप काढण्याची मजा काही औरच असते. पण ड्युटीवर असताना कार्यालयातील बागेत अशी झोप काढण्याची खुमारी काही वेगळीच! असे सूख सगळ्यांनाच मिळत नाही. पुरावा सादर आहे.

Friday, 22 April 2011

डोकेबाज !

सर्वसाधारणपणे उपजीविकेसाठी माणसाला स्वताचे डोके वापरावे लागते. परंतु काहिजणांना मात्र दुसर्याच्या डोक्याचा सुध्दा वापर करावा लागतो. स्व:ताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर संसार मांडलेल्या या कुटुंबाला जरी दुसर्याच्या डोक्याचा आधार घ्यावा लागत असला तरी विक्रिसाठी डोके चालवून मोक्याची जागा पकडली आहे !